जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष आणि इतर मागासवर्गीय आयोगाचे जेष्ठ पदाधिकारी डॉ. बबनराव तायवाडे हे जळगाव दौऱ्यावर आले होते. त्यांच्याशी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार तुषार वाघुळदे यांनी मनमोकळेपणाने संवाद साधला..त्यावेळी सोबत नितीन चौधरी, दीपक राणे ,माजी प्राचार्य अजित वाघ,किशोरी राणे आदी उपस्थित होते.डॉ. बबनराव तायवाडे मुलाखत देताना म्हणाले, ‘ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी’ ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात किंवा 27 टक्के राजकीय आरक्षण लागू करावे आदी प्रमुख मागण्या आहेत.केंद्रात स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना करण्यात यावी, आरक्षणाची 50 टक्के मर्यादा रद्द करण्यात यावी,ओबीसी समाजाला लावण्यात आलेली नॉन क्रीमिलेअरची घटनाबाह्य अट रद्द करावी, नॉन क्रिमिलेअरची मर्यादा 20 लाख करावी, मंडल आयोग, नच्चीपन समिती आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात, ओबीसी शेतकरी, शेतमजुरांना 60 वर्षे वयानंतर पेंशन योजना लागू करावी, महात्मा ज्योतिबा फुले तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न ‘किताब देण्यात यावा आदी मागण्या त्यांनी बोलून दाखविल्या..जळगाव येथील प्रसिद्ध हॉटेल कमल पॅरेडाईज येथे त्यांच्याशी संवाद साधला,तेव्हा ते बोलत होते..
केंद्रात स्वतंत्र ओबीसी मंत्रालय व्हावे; राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे यांची मागणी
RELATED ARTICLES