Friday, October 18, 2024
police dakshta logo
Homeजळगावकेरळमधल्या तरुणींची अंगावर काटा आणणारी कहाणी; ‘द केरळ स्टोरी’ जळगावात आमदारांनी दाखवला...

केरळमधल्या तरुणींची अंगावर काटा आणणारी कहाणी; ‘द केरळ स्टोरी’ जळगावात आमदारांनी दाखवला मोफत.. !

जळगाव/कार्यकारी संपादक तुषार वाघुळदे/पोलीस दक्षता लाईव्ह:- भारतात सध्या या चित्रपटाची खूपच चर्चा होत आहे..हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे असा दावा निर्माते-दिग्दर्शकांनी केला आहे. जळगावात आमदार राजुमामा भोळे आणि हिंदुत्ववादी संघटनेने हा चित्रपट पीव्हीआर नटवर चित्रपट गृहात मोफत दाखविला, व उद्याही दाखविला जाणार आहे. या कथेत त्यांनी असे काही पुरावे दिले आहेत, जे पाहून तुम्ही स्वत: आश्चर्यचकीत झाल्याशिवाय राहणार नाही. चित्रपटाची कथा अंगावर काटा आणणारी आणि तितकीच प्रभावशाली आहे.अनेक प्रेक्षकांनी सोशल मीडियावर ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचा रिव्ह्यू शेअर केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेला ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट (5 मे) थिएटरमध्ये प्रदर्शित झाला ,अनेक ठिकाणी हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. मध्यप्रदेशात मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी हा चित्रपट करमुक्त केला आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा चित्रपट बघावा असे आवाहन केलं आहे. सुदीप्तो सेन आणि विपुल शाह यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून अशी कथा प्रेक्षकांसमोर आणली आहे, जी पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बेलानी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. केरळमधल्या हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून त्यांचं कशा पद्धतीने धर्मपरिवर्तन करण्यात आलं आणि ISIS चे दहशतवादी बनवण्यात आलं, याची कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे.
या चित्रपटाची कथा शालिनी उन्नीकृष्णन हिच्यापासून सुरू होते. अफगाणी सुरक्षा दल तिला दहशतवादी म्हणत आपल्या ताब्यात घेतात. शालिनी त्यांना वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत असते की ती स्वत: दहशतवादी नाही तर पीडित आहे. मात्र तिच्यावर कोणीच विश्वास ठेवत नाही. यानंतर फ्लॅशबॅकमध्ये सुरू होते शालिनीची कहाणी. मूळची कोची इथली शालिनी ही कासरगोडच्या नर्सिंग स्कूलमध्ये शिकवायला जाते. तिथे तिची भेट नीमा, गीतांजली आणि आसिफा यांच्याशी होते. आसिफाला एका विशेष प्रोफेशनल ट्रेनिंगच्या आधारे तिच्या तीन खास मैत्रिणींचं कशाप्रकारे ब्रेन वॉश करते आणि त्यांना इस्लाम धर्म स्वीकारायला सांगते हे चित्रपटाच्या सुरुवातीच्या कथेत पहायला मिळतं. केरळमधल्या या मुली आसिफाच्या जाळ्यात अडकतात आणि त्या गरोदर झाल्यानंतर त्यांना देशाबाहेर पाठवलं जातं. या मुलींसोबतच त्यांच्या कुटुंबीयांनाही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. एका हिंदू कुटुंबातील शालिनी उन्नीकृष्णन ही धर्मपरिवर्तनच्या जाळ्यात अडकून कशा पद्धतीने ISIS ची दहशतवादी बनते, हे पुढे कथेत पहायला मिळतं.

दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी आपल्या देशातील सर्वांत साक्षर मानल्या जाणाऱ्या राज्यातील भयानक वास्तव अत्यंत चतुराईने पडद्यावर मांडली आहे. कशा पद्धतीने सर्व धर्माच्या निर्दोष महिलांना कधी प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तर कधी धमकीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडलं जातं, याचं चित्रण मनाला अस्वस्थ करणारं ठरतं. ‘द केरळ स्टोरी’सारखा विषय मोठ्या पडद्यावर मांडणं सहजसोपं नाही. मात्र सुदीप्तो यांनी दिग्दर्शक म्हणून आपली जबाबदारी चोख पार पाडली आहे. यातील संवादसुद्धा अत्यंत विचारपूर्वक लिहिण्यात आले आहेत. अभिनेत्री अदा शर्माने नेहमीच निवडक चित्रपट स्वीकारल्या आहेत. मात्र ‘द केरळ स्टोरी’मध्ये तिने दमदार अभिनय केलं आहे. चित्रपटात तिने दाक्षिणात्य भाषेचा लहेजासुद्धा योग्य पद्धतीने वापरला आहे. अदासोबतच योगिता आणि सोनिया यांच्याही भूमिका ठळक लक्षात राहतात.
या कथेत काही पुरावे दिले आहेत, जे पाहून तुम्ही स्वत: आश्चर्यचकीत व्हाल. चित्रपटाची कथा अंगावर काटा आणणारी आणि तितकीच प्रभावशाली आहे. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटात सांगण्यात आलेल्या आकड्यावरून बराच वाद सुरू आहे. केरळमधून 30 हजारहून अधिक महिला गायब झाल्या आहेत, असा दावा निर्मात्यांनी केला होता. त्यावर ते कायम आहेत.
अनेक प्रेक्षकांनी सोशल मीडियावर ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचा रिव्ह्यू शेअर केला आहे. काही लोकांनी या चित्रपटावर बंदी घालण्याची देखील मागणी केली होती.
हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे. प्रत्येक भारतीयाने हा चित्रपट पाहण्याची आणि जनजागृती करण्याची अनेकांनी विनंती केली आहे. इतका धाडसी चित्रपट बनवल्याबद्दल विपुल शाह जी आणि सुदिप्तो सेन जी यांनी प्रेक्षकांनी आभार मानले आहेत.

‘हे केरळचेच नव्हे तर आपल्या समाजाचे काळे सत्य आहे!
‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट प्रपोगंडा नाही तर हा सत्य कथेवर आधारित आहे. अनेकांनी हे मान्य केले आहे. केरळमधील मुलींचं धर्म परिवर्तन करुन त्यांना दहशतवादी संघटना ISIS मध्ये कसं सामील केलं जातं हे सांगणारा ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट आहे. काही हॉटेल्स वाल्यांनी चित्रपटाचे तिकीट आणल्यास हॉटेलच्या बिलात 20 ते 25 टक्के सवलत दिली असून अनेक हिंदुत्ववादी संघटना तसेच काही पक्षातर्फे निशुल्क स्वरूपात मुलांना,पालकांना हा चित्रपट दाखविला जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या