Friday, October 18, 2024
police dakshta logo
Homeक्राईमकोथळीत घरफोडी; चोरट्यांनी ऐवज लांबविला

कोथळीत घरफोडी; चोरट्यांनी ऐवज लांबविला

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव जिल्ह्यात चोऱ्या, घरफोडींच्या घटनांत कमालीची वाढ झाली आहे. तालुक्यातील कोथळी गावातील दोन बंद घर फोडून चोरट्यांनी ५२ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निलेश निनु वराडे (वय ४२) रा. कोथळी मुक्ताईनगर हे आपल्या परिवारासह शेती करून उदरनिर्वाह करतात. त्यांच्या काकू आशा रमेश वराडे या त्याच्या घरासमोर राहतात. १४ मे रोजी रात्री १० वाजता काकू आशा यांनी घराला कुलूप लावून कामानिमित्त बाहेर गेले होते. दरम्यान, घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण ५२ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार १५ मे रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आला. शिवाय गावातील पंकज चौधरी यांच्या घरात देखील चोरी झाली आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर निलेश वराडे यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी जाधव करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या