जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- नाशिक येथे ‘रिसेल डॉट इन’ने प्रसिद्ध अभिनेत्री आणि उद्योजिका प्राजक्ता माळी यांच्यासह ” महाराष्ट्र उद्योग भूषण ” पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. महाराष्ट्रातील अनेक उद्योजकाच्या कार्याची दखल घेऊन जळगाव जिल्ह्यातून डॉ.सरोदे यांची निवड करण्यात आली होती. उत्कृष्ठ उद्योजक पशु वैद्यकीय, सामाजिक, राजकीय, क्षेत्रात उत्कृष्ट आणि उलेखनीय कामगिरी केल्याबद्दल डॉ.पवन सरोदे ( खडका ) आणि म्हाळसाई इंटरप्राईजेचा अभिनेत्री तसेच उद्योजिका प्राजक्ता माळी यांच्या हस्ते 2023 महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्रातून जवळपास ५५ जणांना सन्मानित करण्यात आले.जळगाव जिल्ह्यातील डॉ.सरोदे हे एकमेव होते. त्यांचे विविध क्षेत्रातील अनेकांनी अभिनंदन केले आहे. त्यांना भावी वाटचालीसाठी न्यूज २४ तासच्या टीमच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्यात.