Sunday, November 10, 2024
police dakshta logo
Homeजळगावगणपतीनगरातील सुरेश ड्रायफ्रुट दुकानाला अचानक लागली आग; लाखोंचे नुकसान!

गणपतीनगरातील सुरेश ड्रायफ्रुट दुकानाला अचानक लागली आग; लाखोंचे नुकसान!

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव-शहरातील अत्यंत उच्चभ्रू भाग असलेल्या गणपती नगरातील तांबापुरा रस्त्यावरील सुरेश ड्रायफ्रुट दुकानाला शार्टसर्कीटमुळे अचानक लागल्याची घटना घडली. जळगाव महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या चार बंबांद्वारे ही आग विझविण्यात आली. यामध्ये फर्निचरसह एसी जळून खाक झाले आहेत.यात लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

बुधवारी १७ मे रोजी मध्यरात्री सुरेश फुड वर्ल्ड दुकानामध्ये आग लागली. आगीत कार्यालयातील एसी तर दुकानातील फर्निचर, कुलर तसेच काही साहित्य जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेचे अग्निशमन दल दाखल झाले. यावेळी आग विझविण्यासाठी चार बंब लागले .कडाक्याचे ऊन असून अनेक ठिकाणी आगी लागण्याच्या घटना देखील घडत आहेत. महापालिकेचे अग्निशमन विभागाचे चार बंब आणि विक्रांत घोडेस्वार,फायरमन निलेश सुर्वे, प्रकाश चव्हाण, प्रभाकर सोनवणे, विलास पाटील, संजय तायडे, गंगाधर कोळी यांच्याकडून सकाळी चार वाजेपर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. घटनास्थळी रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पोलीस नाईक प्रवीण भोसले, हर्षल पाटील, पोलीस शिपाई किशोर पाटील हे देखील उपस्थित होते. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास प्रवीण जगदाळे हे करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या