दीपनगर ता.भुसावळ/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- मानव सेवा ईश्वर सेवा कल्याण संघ दीपनगर यांच्यावतीने व पुणे येथील दिनेश चंद्रकांत राणे व नयना राणे यांची मुलगी कु.नेत्रा हिच्या वाढदिवसानिमित दिलेल्या धनादेशातुन निंभोरा दीपनगर येथील जि.प शाळेतील गरजू गरिब् विधार्थ्याना शालेय बॅग वाटप करण्यात आल्या.या स्तुत्य सामाजिक उपक्रमाचे मान्यवरांनी कौतुक केले. त्या प्रसंगी तेथे सुमेध मेश्राम (उप- मुख्य अभियंता) औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर आणि मुकेश मेश्राम ( मुख्य औदयोगिक कल्याण अधिकारी ) औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर तसेच मोहन सरदार , मिलिंद खंडारे ,स्वप्निल पाटील ,छगन पवार,प्रफुल्ल निकम तसेच वर्ग शिक्षिका आदी उपस्थित होते.