Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावगरिबांचे डॉक्टर म्हणून ओळख असलेले प्रसिद्ध डॉ.प्रताप जाधव यांचे निधन

गरिबांचे डॉक्टर म्हणून ओळख असलेले प्रसिद्ध डॉ.प्रताप जाधव यांचे निधन

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव शहरातील येथील प्रथितयश वैद्यकीय व्यावसायिक डॉ. प्रताप जाधव यांचे वयाच्या ५४ व्या वर्षी काल शुक्रवारी ७ जुलै रोजी रात्री साडे ११ वाजेच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या निधनामुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. डॉ.प्रताप जाधव यांचे पार्थिव शनिवारी सकाळी त्यांच्या मालती ॲक्सीडेंट हॉस्पिटल येथील भास्कर मार्केट समोरील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. येथूनच दुपारी चार वाजता त्यांची अंत्ययात्रा निघेल आणि वैकुंठ धाम येथे त्यांच्यावर अंत्य संस्कार होतील.

सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. प्रताप जाधव यांनी जळगाव शहरात गेल्या ३० वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात अमूल्य अशी सेवा दिली आहे. गरिबांचे डॉक्टर म्हणूनही त्यांची ओळख आहे. रुग्णांशी त्यांच्याच भाषेत सहज संवाद साधणारा डाॕक्टर. ‘आरोग्य सेवा’ ही ‘सेवा’ कशी असू शकते, याचं एक मुर्तीमंत उदाहरण डाॕक्टरांनी समाजासमोर ठेवलं. वेदना कुणालाच नको असतात…आणि रुग्णाला हसत-खेळत वेदनामुक्त करण्याचे कसब, कला आणि कौशल्य ग्रामीण भागातून आलेल्या या ‘प्रताप’कडे होतं. केशव स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून सेवा कार्य असो की अभिनेते नाना पाटेकर यांच्यासोबत राहून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या परिवाराला केलेली मदत नेहमी साठी लक्षात राहणारी बाब आहे. डाॕक्टर प्रताप जाधव म्हणजे आरोग्य सेवेचा नंदादीप होते असे बोलले जाते. त्यांच्या भास्कर मार्केट समोरील ” मालती एक्सीडेंट हॉस्पिटल” येथे अपघातात जखमी त्यांच्यासमोर आल्यावर ते रुग्णाशी हसतखेळत त्यांच्याच भाषेत बोलत उपचार करायचे. त्यामुळे त्यांचे खान्देशात मोठे नाव होते. गेल्या काही वर्षांपासून ते कर्करोगाच्या आजाराशी झुंजत होते. अखेर शुक्रवारी ७ जुलै रोजी रात्री त्यांची खाजगी रुग्णालयात प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या