Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeक्राईमगाझियाबाद मध्ये ऑनलाईन गेमिंगद्वारे धर्मांतर ; महाराष्ट्र कनेक्शन...!

गाझियाबाद मध्ये ऑनलाईन गेमिंगद्वारे धर्मांतर ; महाराष्ट्र कनेक्शन…!

गाझियाबाद/वृत्तसंस्था:- उत्तरप्रदेशातील गाझियाबादमध्ये मोबाईलमधील ऑनलाईन गेमिंगद्वारे धर्मातर करण्यात आले आहे. तर गाझियाबादमधल्या धर्मांतराला महाराष्ट्र कनेक्शन असून, महाराष्ट्रातील मुंब्र्यातही 400 जणांचं धर्मांतर करण्यात आल्याची शक्यता आहे. ऑनलाईन धर्मांतर करणाऱ्या मुख्य आरोपीनं गौप्यस्फोट केल्याचं डीसीपी निपुण अग्रवाल यांनी सांगितलंय. मोबाईल गेमच्या आडून ब्रेन वॉश करत धर्मांतर करण्यात आल्याची माहिती आहे. ऑनलाईन धर्मांतर करणाऱ्या मुख्य आरोपीची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. महाराष्ट्रातील मुंब्य्रात 400 जणांचं धर्मांतर करण्यात आल्याचं आरोपीने जबाबात सांगितलेय. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरु आहे. ऑनलाईन गेमिंगचा वापर करुन ब्रेन वॉश करत धर्मांतर केले जात असल्याचे समोर आले आहे असे डीसीपी अग्रवाल यांनी सांगितले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या