Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeताज्या बातम्यागाव तलावातील गाळ मोफत देण्यात येणार; जैन संघटनेचा पुढाकार

गाव तलावातील गाळ मोफत देण्यात येणार; जैन संघटनेचा पुढाकार

सोलापूर/ जिल्हा प्रतिनिधी खंडेराव पाटील /पोलीस दक्षता लाईव्ह:- सोलापूर जिल्ह्यातील 100 खेड्यातील 100 गाव तलावातील गाळ काढून तो गाळ स्थानिक शेतकऱ्यांना विनामूल्य देण्यात येणार आहे,ह्या शासनाच्या योजनेची सुरवात महाराष्ट्रातील 28 जिल्ह्यात भारतीय जैन संघटनेच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे.

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व खाते प्रमुख अधिकारी यांच्या सोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत बीजेएसचे समनव्यक केतन शहा,प्रविण बालदोटा, रवी गांधी,विशाल मेहता,शाम पाटील,अभिनंदन विभूते,विक्रात बशेट्टी,प्रदीप बलदोटा उपस्थित होते. ज्या गावाच्या तलावातील गाळ काढावयाचा आहे, त्या गावच्या सरपंचाने एक अर्ज भरून देण्यास विनंती करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी 9370420033 या भ्रमणध्वनी वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या