Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावगिरणा नदी पात्रात मातीच्या ढिगाऱ्याखाली तरुणाचा दबून मृत्यू

गिरणा नदी पात्रात मातीच्या ढिगाऱ्याखाली तरुणाचा दबून मृत्यू

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह- धरणगाव तालुक्यातील वैजनाथ, टाकरखेडा परिसरातील गिरणा नदीपात्राच्या किनाऱ्यावर ट्रॅक्टरमध्ये रेती भरली असताना एका तरुणाचा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी २७ रोजी सकाळी ६ ते ८ वाजेच्या दरम्यान घडली असल्याची चर्चा ग्रामस्थांत सुरु आहे. तरुण हा शौचासाठी नदीपात्रातील किनाऱ्यावर गेला, यावेळी त्याच्या अंगावर मातीचा ढीग पडून तो जागीच मृत झाला असल्याचे संध्याकाळी चर्चा सुरु होती. दरम्यान, हे प्रकरण दाबले गेले असल्याबाबत ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याबाबत पंचक्रोशीतील पोलीस पाटील, पाळधीचे पोलीस यांनी मात्र अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही. याबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनाही माहिती मिळाली आहे. त्यांनी या घटनेची विचारपूस केल्याचे समजते.

गिरणा नदीपात्रात बंदी असतानाही अनेक जण वाळू वाहतूक करीत असताना दिसून येतात. गुरुवारी सकाळी पहाटे वैजनाथ परिसरात गिरणा नदीच्या किनाऱ्यावर ट्रॅक्टरमध्ये वाळू भरीत असताना एका तरुण मजुराच्या अंगावर बाजूच्या टेकडीच्या मातीचा मोठा ढिगारा त्याच्या अंगावर पडला. त्याखाली तो दबला जाऊन जागीच मयत झाला. मात्र प्रकरणाची वाच्यता होऊ नये म्हणून संबंधित घटनास्थळावरील संशयित लोकांनी तत्काळ त्याला घेऊन परराज्यातील त्याच्या गावाला नेल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या