Tuesday, December 24, 2024
police dakshta logo
Homeक्राईमगुजरात राज्यातून तस्करी; वाघाची कातडी व नखे विक्री करणाऱ्यांना अटक

गुजरात राज्यातून तस्करी; वाघाची कातडी व नखे विक्री करणाऱ्यांना अटक

जळगाव/कार्यकारी संपादक तुषार वाघुळदे/पोलीस दक्षता लाईव्ह:- शहादा येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वाघाच्या कातडीची तस्करी करणाऱ्या टोळीला बसस्थानकाजवळ सापळा रचून मुद्देमालासह चार जणाांना गजाआड केेेेली आहे,या प्रकाराने एकच खळबळ माजली आहे.

शहादा वन विभागातील अधिका-यांना गुप्त बातमी मिळाल्यानुसार गुजरात राज्यातून वाघाची कातडी ,नखे विक्री होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शहादा बसस्टँड येथे तीन आरोपींना वाघाची कातडी व नखे सहित दिनांक २९ / ०४ / २०२३ रोजी रात्री १०.३० वाजता अटक करण्यात आले . कसून चौकशी केली असता ज्या आरोपीला सदर वाघाचे अवयव विक्री केले जाणार होते , त्या आरोपीला देखील त्याचवेळी शिताफीने अटक करण्यात आली . या कार्यवाहीमध्ये एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपी रामचंद्र गोविंदा जाधव ,( वय- ४० वर्ष , रा . मोराने ,ता .सटाणा जि .नाशिक) ,रामा सायसिंग उमरे , (वय २५ वर्ष , रा .चिपी ,ता . सटाणा जि .नाशिक) , सुखीराम महारु भदाणे , (वय – ४५ वर्ष , रा . बंधारपाडा ,ता .साक्री जि .धुळे) ,चंदन शमनलाल डेटवाणी , (वय २७ वर्ष रा .शहादा जि .नंदुरबार ) सदर आरोपींकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्यात वन्यप्राणी वाघाची कातडी १ नग , वाघाची नखे – २० नग ताब्यात घेण्यात आले .

सदर आरोपी हे मोठे तस्कर आहेत अशी माहिती मिळाली आहे.आरोपीविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या विविध कलमाअंतर्गत वन गुन्हा क्र .०१/२०२३ दिनांक २९ / ०४ / २०२३ अन्वये वन गुन्हा नोंदवण्यात आला . सदर आरोपींना शहादा येथील न्यायालयात हजर केले असता ०४/०५/२०२३ पर्यंत वन कोठडी मिळाली आहे. पुढील तपास बारकाईने सुरु आहे .सदर कार्यवाहीत कृष्णा भवर, उपवनसंरक्षक नंदूरबार वनविभाग नंदूरबार यांच्या मार्गदर्शनाखाली संजय साळुंके ,(सहा . वनसंरक्षक अक्राणी), आशुतोष मेढे (वनक्षेत्रपाल शहादा) , एस .एन .पाटील (वनपाल दरा) , डी . बी .ग जमदाळे (वनपाल जयनगर) , वनरक्षक एस .जी मुकाडे , ए .एन तावडे ,आर .जी . वसावे ,एफ.एन.वसावे , बालाजी इंगळे , दीपक पाटील ,वाहन चालक नइम मिर्जा , विक्रम पानपाटील यांनी या कार्यवाहीमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला. आणि यशस्वीरित्या आरोपींना जेलबंद करून वन्यप्राणी वाघाचे अवयव हस्तगत करून कार्यवाही केली आहे . सदर वन गुन्ह्याच्या अनुषंगाने एस .डी साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल आशुतोष मेढे पुढील तपास करत आहेत.दरम्यान या घटनेमुळे तस्कर करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. वनविभागामध्ये सुद्धा या घटनेची चर्चा सुरू झाली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या