जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या नगर रचनाकार (गट-अ, राजपत्रित क्लास वन) अधिकारीपदाचा परिक्षेत देवगांव येथील सुपुत्र तसेच सध्या येवला (नाशिक) नगरपरिषदेत नगर रचना सहायक म्हणुन कार्यरत असलेले अमोल पाटील हे राज्यात पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. अमोल यांचे बंधु दिपक पाटील यांची साक्री नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी नियुक्ती झाली. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या नगर रचनाकार (गट-अ, राजपत्रित क्लास वन) अधिकारी पदाचा परिक्षेत देवगांव येथीलच प्रा.विलास चिंधु पाटील यांची सुपुत्री कु.धनश्री हिने देखील घवघवीत यश संपादन केल्याबद्दल श्री.अमोल, श्री.दिपक आणि कु.धनश्री हिच्या वडिलांचा जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी त्यांचा सत्कार करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शेतकी संघाचे संचालक दासभाऊ पाटील, रोहीदासगुरूजी पाटील, विद्यानंद पाटील, संभाजी गोविंदा पाटील, प्रकाश धनराज पाटील, छोटुशेठ वाणी व संजय पाटील यांचेसह मान्यवर उपस्थित होते.