Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावघरकुल घोटाळा- जळगाव मनपाचे ४ नगरसेवक अपात्र ....! राजकीय क्षेत्रात खळबळ...!!!

घरकुल घोटाळा- जळगाव मनपाचे ४ नगरसेवक अपात्र ….! राजकीय क्षेत्रात खळबळ…!!!

मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…

जळगाव /कार्यकारी संपादक/ तुषार वाघुळदे/ पोलीस दक्षता लाईव्ह:-:जळगाव बहुचर्चित घरकुल घोटाळ्यात दोन वर्षापेक्षा जास्त शिक्षा सुनावल्यावर देखील नगरसेवकपदी कायम राहिल्याने विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज गुरुवार दि.१३ एप्रिल रोजी दुपारी सुनावणी झाली.यात शहर महापालिकेचे चार विद्यमान अभ्यासू,जेष्ठ नगरसेवक अपात्र ठरविले गेले आहेत,या निर्णयाने महापालिका व राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून वेगवेगळी चर्चा होत आहे.

शहरातील विविध मध्यवर्ती भागात चर्चेला उधाण आले आहे.जिल्हा न्यायालयाच्या या महत्वपूर्ण निकालाने राजकिय वर्तुळात चर्चा रंगली आहे ,दरम्यान भविष्यात राजकीय समीकरण बदलणार असे भाकीत व्यक्त केले जात आहे.
घरकुल घोटाळ्यात दोन वर्षांपेक्षा जास्त देखील नगरसेवकांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर गुरूवार १३ एप्रिल रोजी जळगाव जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली. यात महापालिकेतील भाजपाचे ४ नगरसेवक अपात्र ठरविले आहे. महापालिकेसह राजकीय क्षेत्रांत चर्चा रंगू लागली आहे. जिल्हा न्यायालयाने दिलेल्या या निकालामुळे खळबळ उडाली आहे. जळगावातील घरकुल घोटाळ्याचा निकाल धुळे न्यायालयाने ४ वर्षापुर्वी दिला होता. या निकालात संशयीत आरोपींना २ वर्षांपेक्षा अधिक शिक्षा झाली होती. या निकालानुसार जळगाव शहर महानगरपालिकेत विद्यमान असलेले पाच नगरसेवक लता रणजीत भोईटे, कैलास सोनवणे, भगत बालाणी, सदाशिवराव ढेकळे, दत्तात्रय कोळी हे अपात्र ठरले आहेत.मात्र त्यांनी कुठलाही राजीनामा दिला नाही, त्यामुळे विरोधी विरोधी पक्षातील नगरसेवक प्रशांत नाईक यांनी जळगाव जिल्हा न्यायालयात ३ वर्षांपूर्वी याचिका दाखल केली होती. या याचिकेचा खटला न्यायालयात सुरू होता. मध्यंतरी कोरोना महामारीचा काळ आल्यामुळे याची केवळ कामकाज झालेले नव्हते. आता त्यावर कामकाज झाल्यानंतर जिल्हा न्यायालयाने गुरुवारी १३ एप्रिल रोजी दपारी अडीच वाजता निकाल दिला आहे.


जेष्ठ नगरसेवक दत्तात्रय कोळी ( जैनाबाद ) यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली असल्यामुळे त्यांच्याविषयी काही आदेश झालेले नाही. तर व्यावसायिक भगत बालाणी, कैलास सोनवणे, लता भोईटे, सदाशिव ढेकळे हे अपात्र ठरले आहेत. जळगाव दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर न्यायमूर्ती श्री.सय्यद यांनी अपात्रतेसंदर्भात गुरुवारी दुपारी हा निकाल दिला आहे. अपात्र नगरसेवकांच्या वतीने अँड. प्रदीप कुलकर्णी तर याचिकाकर्ते प्रशांत नाईक यांच्यावतीने अँड. सुधीर कुलकर्णी यांनी न्यायालयात बाजू मांडली. दरम्यान या अनपेक्षित निकालाने जळगावच्या राजकीय क्षेत्रात विविध प्रकारच्या चर्चा होताना दिसून येत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या