Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावघर खरेदीसाठी ३० लाख आणण्यासाठी महिलेचा छळ; राहाताच्या सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल..

घर खरेदीसाठी ३० लाख आणण्यासाठी महिलेचा छळ; राहाताच्या सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल..

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव जिल्ह्यात विवाहितेचे छळ वाढतच चालले आहेत.नोकरी करण्यासह माहेरहून नवीन घर खरेदी करण्यासाठी ३० लाख रुपयांची मागणी करत विवाहितेला बेदम मारहाण करत दमदाटी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या संदर्भात पतीसह सासू-सासऱ्यांकडे मंडळी विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील जोशी कॉलनीतील माहेर असलेल्या प्रियंका सचिन पानसरे (वय ३३) यांचा विवाह नगर जिल्ह्यातील राहाता येथील रहिवासी सचिन अरुण पानसरे यांच्याशी झालेला आहे. विवाहितेने नोकरी करावी तसेच नवीन घर घेण्यासाठी माहेरहून ३० लाख रुपये आणावे अशी मागणी केली. दरम्यान विवाहितेने पैसे आणले नाही या कारणावरून तिला वेळोवेळी बेदम मारहाण व शिवीगाळ करत दमदाटी करून छळ केला, तसेच सासू, सासरे आणि दीर यांनी देखील पैशांसाठी विवाहितेला मानसिक त्रास दिला. हा प्रकार घडल्यानंतर विवाहिता माहेरी निघून आल्या. रविवारी ९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पती सचिन अरुण पानसरे, सासू सुमन अरुण पानसरे, सासरे अरुण धोंडीराम पानसरे आणि दीर सागर अरून पानसरे रा.राहता जि. अहमदनगर यांच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक सुनिल सोनार करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या