Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्याचंद्रपूरनजीक कार-ट्रॅव्हल्सच्या भीषण अपघातात चार ठार

चंद्रपूरनजीक कार-ट्रॅव्हल्सच्या भीषण अपघातात चार ठार

चंद्रपूर/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- चंद्रपूर-विदर्भात कार आणि खासगी ट्रॅव्हल्सच्या अपघातात चार प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.समृद्धी महामार्गावर मालवाहू वाहनाचा भीषण अपघात झाल्याची घटना ताजी असतानाच आता चंद्रपुरात कार आणि खाजगी बसचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. नागपुरहून नागभीडकडे येणारी मारुती कार आणि खाजगी बसचा अपघात झाला असून त्यात चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. त्यानंतर मृत प्रवाशांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. मृत्यूमुखी पडलेले चारही प्रवासी नागपुरचे असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर आता अपघातग्रस्त कार आणि बसला महामार्गावरून बाजूला हटवण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे.मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरहून नागभीडच्या दिशेने येणाऱ्या मारुती कारला भरधाव खाजगी ट्रॅव्हल्सने धडक दिली आहे. त्यात चार प्रवाशांचा घटनास्थळीच तडफडून मृत्यू झाला आहे. तसेच आणखी चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नागपुरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघात झाल्यानंतर नागभीड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मृतांची ओळख पटवण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे. अपघाताची माहिती समजताच नागभीड परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अपघातस्थळी गर्दी केली आहे. काही दिवसांपूर्वीच या मार्गावर अपघात झाला होता, आता पुन्हा याच मार्गावर भीषण अपघात झाल्याने खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या