संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह
चांदवड/प्रतिनिधी उदय वायकोळे/पोलीस दक्षता लाईव्ह:-हिंदुहृदयसम्राट मित्रमंडळाच्या वतीने, गेल्या सात वर्षांपासून धोडंबे येथे सर्वधर्म समभावाची गुढी उभारून मराठी नवीन वर्षाची सुरुवात केली जाते.या वर्षीही हा उत्सव मोठ्या आनांदत साजरा करण्यात आला.त्याप्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत देशात वाढत चाललेल्या जातीधर्म द्वेषावर नाराजी व्यक्त करत, सर्वधर्म समभाव जोपासत, विविधतेत एकता रुजवण्याबद्दल मार्गदर्शन केले.त्याप्रसंगी,
हिंदुहृदयसम्राट मित्र मंडळाचे संस्थापक विजय फापाळे,
गावातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. काकासाहेब पवार, डॉ. नितीन शाहीर, सोसायटी चेअरमन नितीन दादा उशीर, वटेश्वर पतसंस्थेचे उपसभापती इ. बी. उशीर सर, वन विभागाचे वनक्षेत्रपाल चौधरी साहेब,माजी ग्राम पंचायत सदस्य सलीम मोगल, श्रीराम मित्र मंडळाचे अध्यक्ष. प्रकाश उशीर, यांनी मनोगत व्यक्त करत मंडळाच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
प्रबळ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रोशन पवार यांनी आभार मानले.
डॉ सतीश साळुंखे,वनरक्षक वाल्मिक व्हरगळ, वनरक्षक विजय टेकनर, ग्राम पंचायत सदस्य सोनुभाऊ केदारे, सकाळचे पत्रकार श्री.बाळासाहेब बच्छाव, कॉम्रेड तुकाराम गायकवाड तसेच हिंदुहृदयसम्राट मित्र मंडळाचे कार्यकर्ते, श्रीराम मित्र मंडळ, जय विर हनुमान मित्रमंडळ,आदिशक्ती युवा ग्रुप, भिमक्रांती मित्र मंडळ, संत गोरोबा काका मित्रमंडळ, संत रोहिदास महाराज मित्रमंडळ, संत सेना महाराज मित्रमंडळ, विश्वकर्मा मित्रमंडळ, श्री.बसवेश्वर मित्रमंडळ, शंभूराजे मित्रमंडळ, ई. मित्र मंडळाचे कार्यकर्ते, धोडंबे व पंचक्रोशीतील विविध जाती धर्माचे नागरिक उपस्थित होते.गुढीवर तिरंगा ध्वज सर्वात उंच, आणि भगवा, निळा, हिरवा, लाल, पिवळा, असे विविध जाती धर्माचे प्रतीक मानले जाणारे ध्वज लावून सर्वधर्म समभाव एकतेची गुढी उभारली.
हिंदुहृदयसम्राट मित्रमंडळाचे संस्थापक श्री.विजय फापाळे यांनी, मनोगत व्यक्त करताना देशातील वाढत चाललेल्या जाती धर्मातील द्वेष, तेढ याबाबत खेद व्यक्त केला. आपण भारतात राहणारे सर्व जाती धर्माचे लोक हे भारत मातेचे पुत्र आहोत. त्यामुळे आपसात बंधुत्वाचे नाते जोडून, विविधतेत एकता साधून, गुण्या गोविंदाने राहावे, असे उपस्थितांना आवाहन केले.