चांदवड/जिल्हा प्रतिनिधी उदय वायकोळे/पोलीस दक्षता लाईव्ह:- शहरातील नेमिनाथ जैन संस्थेत 31 मे रोजी सायंकाळी 5 वाजता दिंडोरी लोकसभा खासदार चषक ,बक्षीस वितरण सोहळा मराठी सिने अभिनेते मकरंद अनासपुरे ,केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार ,आमदार डॉ राहुल आहेर , केदा नाना आहेर जिल्हा अध्यक्ष भाजप , भूषण भैय्या कासलीवाल, प्रथम नगराध्यक्ष चांदवड तसेच सर्व दिंडोरी लोकसभा मतदारसंघ तालुका पदाधिकारी दिंडोरी लोकसभा मतदार संघ ,सर्व ज्येष्ठ नेते ,जिल्हा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झाला. सर्व जिल्ह्यातील खेळाडू पारितोषिक विजेत्या टीम यांना बक्षीसे वितरित करण्यात आले. जिल्हास्तरीय स्पर्धा सकाळी 7.30 वाजेपासून श्री नेमिनाथ जैन कॉलेज ग्राउंड,चांदवड क्रिकेट – क्रीडा संकुल मैदान चांदवड ,कालिका माता रोड चांदवड येथे क्रीडा स्पर्धा झाल्या.यावेळी संस्था पदाधिकारी बेबीलाल संचेती, अजित सुराणा ,जवाहर आबाड यांचेसह भाजप पदाधिकारी मोहन शर्मा,अशोक व्यवहारे,वर्धमान पांडे मामा,तालुकाध्यक्ष मनोज शिंदे,शहराध्यक्ष प्रशांत ठाकरे,आदिवासी सेलचे संजय पाडवी, विशाल ललवाणी,व्यापारी आघाडीचे महेश खंदारे, शांताराम भवर,मनोज बांगरे,गोरख ढगे आदी उपस्थित होते.
चांदवड येथे खासदार चषक संपन्न, नेत्यांसह मकरंद अनासपुरेंची उपस्थिती
RELATED ARTICLES

