Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeताज्या बातम्याचांदवड शहरात रस्त्याचे भूमिपूजन

चांदवड शहरात रस्त्याचे भूमिपूजन

चांदवड/विशेष प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- चांदवड शहर हे मुंबई आग्रा महामार्गजवळील महत्वाचे शैक्षणिक केंद्र समजले जाते परंतु महामार्गापासून गावात जाणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली होती.मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नागरिक वारंवार तक्रारी करत होते. चांदवड शहराचे प्रथम नगराध्यक्ष श्री भूषण भैया कासलीवाल यांनी प्रशासक काळ आल्याने अनेक अडचणी येत असताना शासनाकडे पाठपुरावा करून निधी मंजूर करून आणल्याचे सांगितले. आज सकाळी 10 वाजता शनी मंदिर ते वरचे गावातील जैन मंदिर या रस्त्याचे भूमिपूजन करून कामाला सुरवात होणार असल्याचे श्री कासलीवाल यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. यावेळी जेष्ठ नेते मोहन शर्मा, महेश बोराडे, किशोर क्षत्रिय, महेश खंदारे, अंकुर कासलीवाल, सुरेश जाधव, पप्पू भालेराव, प्रशांत भालेराव, आदींसह नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या