Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeक्राईमचाळीसगावात घरफोडी; लाखोंचा ऐवज लंपास..

चाळीसगावात घरफोडी; लाखोंचा ऐवज लंपास..

चाळीसगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात करगाव रोडवरील, देवकर नगर येथे अज्ञात चोरट्याने बंद घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून घरातून चांदीचे शिक्के व रोख रक्कम असा एकूण १ लाख २१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला हे. ही घटना दि, २९ रोजी उघडकीस आली असून याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरोधात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अनिल वामनराव विसपुते वय ५४,देवकर नगर, करगांव रोड, चाळीसगांव यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनूसार ते दि.२७ जून रोजी सकाळी ०८ वाजेच्या सुमारास मुंबई येथे गेले होते. त्यानंतर संकाळी त्यांची पत्नी अनुपमा व मुलगा अनिकेत असे संकाळी ९ वाजेच्या सुमारास धुळे येथे गेले. जातांना ते घराच्या मुख्य दरवाज्यास कुलूप लावुन गेले होते. आज दि.२९ जून रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अनिल विसपुते हे चाळीसगांव येथे घरी आले. तेव्हा घराचे मुख्य दरवाज्याचे सेंट्रल लॉक आणि कडया तुटलेल्या होत्या. दरवाजा उघडा करून आत जावून पाहिले असता, घरातील दोन्ही बेडरुमचे दरवाज्याचे लॉक तोडलेले होते व बेडरुम मधील कपाटे उघडे होते. त्यातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. बेडरुमच्या कपाटामध्ये असलेल्या सुटकेस मधील चांदीचे शिक्के आणि रोख रक्कम दिसून आले नाही. तेव्हा त्यांची खात्री झाली की, कोणीतरी अज्ञात चोरटयाने दरवाज्याचे लॉक तोडून घरात प्रवेश करुन घरामध्ये असलेले चांदीचे शिक्के व रोख रक्कम चोरी केली आहे. यात ९७ हजार २०० रुपये रोख व चाँदी शिक्के, ताट, पॅन्डल असा एकूण १ लाख २१ हजारर ७०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेला.या प्रकरणी चाळीसगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या