Friday, October 18, 2024
police dakshta logo
Homeजळगाव ग्रामीणचिंचोलीनजीक वादळाने कंटेनर पलटी, आडोशाला उभे असलेले दोन जण दबून ठार

चिंचोलीनजीक वादळाने कंटेनर पलटी, आडोशाला उभे असलेले दोन जण दबून ठार

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:–सध्या अवकाळी पावसाने जिल्ह्यात थैमान घातले आहे. अवकाळी आलेल्या जोराच्या वादळामुळे उभा कंटेनर पलटी झाला. आडोश्याला उभे असलेले दोन जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना जळगाव तालुक्यातील चिंचोली नजीक घडली.गावाजवळील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाच्या ठिकाणी गुरूवारी २७ एप्रिल रोजी दुपारीच्या सुमारास घडली. जखमीस जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. भोला श्रीकुसूम पटेल रा. सानीकावा जि. सिवान बिहार आणि चंद्रकांत वाभळे (वय-५२) रा.चाळीसगाव ह. मु. पुणे असे मयत झालेल्या व्यक्तीचे नावे आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,
जळगाव तालुक्यातील चिंचाली गावाजवळ नवीन शासकीय हॉस्पिटलच्या इमारतीचे बांधकामाचे काम सुरू आहे. या बांधकाचा कंत्राट पुण्यातील न्याती कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. गेल्या जानेवारीपासून या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. या ठिकाणी काही बिहार राज्यातील मजूर हे दोन महिन्यांपासून काम करत आहे. गुरूवारी २७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अवकाळीपाऊस व वादळ सुरू झाले.आलेल्या मोठ्या वादळापासून जीव वाचविण्यासाठी येथील मजूर पत्र्याच्या शेडमध्ये गेले. परंतू वादळी वाऱ्याचा वेग जास्त असल्याने पत्र्याचे शेड देखील उडाली. त्यामुळे शेडमधील मजूर हे पटांगणात उभा असलेल्या कंटेनरच्या बाजूला जात आडोसा घेतला. दरम्यान, वेगाने सुरू असलेल्या वादळी वाऱ्यामुळे कंटेनर देखील पलटी झाला. या कंटेरनखाली भोला श्रीकुसूम पटेल रा. सानीकावा जि. सिवान बिहार आणि इंजिनिअर चंद्रकांत वाभळे (वय-५२) रा.चाळीसगाव ह. मु. पुणे हे दोघे दाबले गेल्याचे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर सोबत असलेला अफरोज आलम (वय-२३) रा. कुंडाळे जि. पुरण्या बिहार हा जखमी झाला. जखमीला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तर क्रेनच्या मदतीने कंटेनर बाजूला करून मृतदेह बाहेर काढण्यात आले. घटना घडल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली ,या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या