मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह..
जळगाव / कार्यकारी संपादक तुषार वाघुळदे / पोलीस दक्षता लाईव्ह:- भारतीय वास्तववाडी चित्रकलेचे जनक महान चित्रकार राजा रवी वर्मा यांच्या चित्रांच्या लिथोग्राफ प्रिंट्सचे प्रदर्शन आज दिनांक १८ एप्रिलपासून पु.ना.गाडगीळ आणि सन्स येथे सुरू झाले आहे.,हे चित्र प्रदर्शन ३० तारखेपर्यंत कला प्रेमींसाठी खुले राहणार आहे.
या प्रदर्शनाचे उदघाटन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त जेष्ठ शिल्पकार रमाकांत सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून रामानंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील , जेष्ठ चित्रकार प्राध्यापक राजेंद्र महाजन ,जेष्ठ कलारसिक प्रदीप रस्से ,योगेश सुतार आदी उपस्थित होते.
या कार्यक्रम प्रसंगी कलाप्रेमी शाम कुमावत , मनोज जंजाळकर ,तुषार वाघुळदे ,श्री.वसिष्ठ आदी आवर्जून उपस्थित होते.
राजा रवि वर्मा यांची कल्पनाक्षमता या सर्वांच्या पलिकडची होती. रवि वर्मा यांनी चित्रकलेत असे प्रयोग केले,जे त्याआधी कुणीही केले नव्हते. आणि म्हणूनच त्यांची चित्रकारिता त्यांना अनेक नवनव्या उंचीवर घेऊन गेली. राजा रविवर्मा यांनीही ‘दुष्यंता आणि शकुंतला’ आणि ‘नल आणि दमयंती’ यासह महाभारतातील दृश्ये रंगवली होती. त्यांच्या चित्रांमध्ये हिंदू पौराणिक पात्रांना प्रमुख स्थान मिळाले असे मान्यवरांनी सांगितले.अनेक कलाप्रेमी या प्रदर्शनातील चित्रांचा आस्वाद घेत आहेत..