Saturday, July 12, 2025
police dakshta logo
Homeताज्या बातम्याचोपडा तालुक्यातील गणपूर गावात ' कृषिदूतां 'कडून शेतकऱ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

चोपडा तालुक्यातील गणपूर गावात ‘ कृषिदूतां ‘कडून शेतकऱ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

चोपडा/ प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- चोपडा तालुक्यातील गणपूर गावात कृषिदूतांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. कृषी महाविद्यालय अमळनेर येथील अंतिम वर्षातील विद्यार्थी कृषिदूत यश राजेंद्र बऱ्हाटे, वैभव राजेंद्र अनर्थे, दीप सुभाष खुळे, आशिष वसंत बाविस्कर, विशाल केशव जगताप, अभिषेक पोपट निकम, यांनी ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत सर्वेक्षण केले.सरपंच श्रीमती मंदाकीनी माधवराव पाटील, उपसरपंच युवराज रघुनाथ पाटील, शेतकरी भटू धर्मराज पाटील, अमोल पाटील, प्रशांत पाटील, राहूल पाटील, प्रकाश पाटील तसेच युवा शेतकरी भावेश भटू पाटील यांनी कृषिदूतांचे स्वागत केले.

या कार्यक्रमातअमळनेर येथील नवलभाऊ कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शुभांगीचव्हाण, प्रोफेसर महेश चव्हाण, प्रा. गिरीष पाटील, प्रा. संदिप साळुंखे, प्रा.तुषार देसले, प्रा. नरेंद्र बोरसे, प्रा. शिवाजी गावीत, प्रा. अमोल घाडगे, प्रा. लक्ष्मण बोंद्रे, प्रा. सुनिल गावीत, प्रा.सुदीप पाटील, प्रा.राम रेजितवाड , प्रा. हर्षदा गीते यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत हे गावा- गावातील पीक लागवड पद्धती, आधुनिक शेतीची माहिती, माती व पाणी परिक्षण कीड आणि रोग यांचे एकात्मिक व्यवस्थापन, शेती विषयक विविध समस्या तसेच त्यावरील उपाय, पीक प्रात्यक्षिक तसेच इतर शेतीसंबंधी माहिती व मार्गदर्शन करण्यात आले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या