Friday, September 20, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्याचोरी करण्याच्या संशयाने फुलगावात तरुणाचा खून

चोरी करण्याच्या संशयाने फुलगावात तरुणाचा खून

वरणगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यात गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथील मजूर तरुणाचा वायर चोरण्याच्या संशयावरून झालेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यावरून वरणगाव पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघा संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पंकज रामचंद्र सोनवणे (वय २०, रा. धामणगाव, ता. शहापूर जि. बऱ्हाणपूर, ह. मु. चिंचोल ता. मुक्ताईनगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो चिंचोल येथे आई, वडील, दोन भाऊंसह राहतो. सर्व जण हातमजुरी करतात. २८ जून रोजी सकाळी ७ वाजेपूर्वी घटना घडली आहे.पंकज सोनवणे हा संशयित पंकज सोनवणे हा संशयित आरोपी अविनाश पुंडलिक पाटील (वय ५४, रा. फुलगाव ता. भुसावळ) यांच्या शेतात गेला होता. तेथे पंकज हा वायर चोरी करीत असेल असा संशय आल्याने संशयित अविनाश पाटील याने आणखी तिघांना बोलावून घेतले. त्यांनी पंकजला जाब विचारून कुठल्यातरी धारदार शस्त्राने डावे बाजूस छातीवर, पोटावर, पायावर गुडघ्यावर, पाठीवर मारहाण करून त्यास ठार मारले. तसेच, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मयताच्या अंगावरील कपडे काढून फेकून दिले. वरणगाव पोलीस स्टेशनला ही माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यास वरणगाव ग्रामीण रुग्णालयात त्याला मयत घोषित करण्यात आले. वैद्यकीय अहवालानुसार मयत पंकज सोनवणे याला मारहाण झाली असून त्यात त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार २ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक परशुराम बाबासाहेब दळवी यांच्या फिर्यादीवरून चौघा संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या