Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावछत्रपती राजे संभाजी शिक्षण शास्त्र महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा

छत्रपती राजे संभाजी शिक्षण शास्त्र महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव येथील मंगलमूर्ती बहुउद्देशीय मंडळ संचलित छत्रपती राजे संभाजी शिक्षणशास्त्र महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते योगेश देसले, भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रेखा पाटील, अध्यक्ष श्री.आर व्ही पाटील हे उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष आर व्ही पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण करून स्वातंत्र्याचा लढा कशाप्रकारे लढला व जिंकला याबद्दल माहिती देण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.अरविंद पाटील छत्रपती शाहू महाराज आय.टी.आय चे प्राचार्य कुंदन पाटील तसेच प्रा.माधुरी पाटील प्रा. डॉ.विश्वनाथ महाजन प्रा.डॉ.जगदीश निमकर प्रा.लता परदेशी वरिष्ठ लिपिक सरिता येवले प्रा.शांताराम वाघ प्रा.परमेश्वर महाजन प्रा.निखिल वाघ प्रा.प्रशांत पाटील ग्रंथपाल गायत्री भांडारकर योगेश खैरनार ,सागर मोरे ,प्रशांत कोळी, सागर माळी व विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.जगदीश निमकर यांनी केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या