जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव येथील जय दुर्गा भवानी क्रीडा मंडळ मेहरूण संचलित, जयदुर्गा प्राथमिक, माध्यमिक व के. कौतिक चावदस महाजन उच्च माध्यमिक विद्यालय मेहरूण, जळगाव येथे आज दिनांक १५ ऑगस्ट २०२३ रोजी ७६वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. प्रथमतः भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून जळगाव लायन्स क्लबचे अध्यक्ष योगेश सांखला यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले जय दुर्गा भवानी क्रीडा मंडळ मेहरूणचे उपाध्यक्ष मा.श्री.अनिल दादा पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती मा.सदस्य ज्ञानेश्वर दादा नाईक तसेच लायन्स क्लब जळगावचे पदाधिकारी रितेश छोरीया, पराग आगीवाल माजी अध्यक्ष, मनोज मालू माजी सेक्रेटरी. सौ. सपना छोरीया पहिल्या उपाध्यक्षा तर सदस्या सौ. शितल सांखला विद्यालयाच्या जेष्ठ शिक्षिका सौ. ज्योती इंगळे मॅडम व प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सागर कोल्हे सर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र पाटील सर यांनी केले तर आभार महेश बच्छाव सर यांनी केले. तसेच विद्यार्थ्यांनी वकृत्व, गीतगायन, रांगोळी, निबंध, चित्रकला इ. स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्युर्तपणे आपला सहभाग नोंदवला तसेच बक्षीस वितरणदेखील यावेळी करण्यात आले. यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थी पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.