Monday, February 9, 2026
police dakshta logo
Homeजळगावजळगावचा अट्टल गुन्हेगार ' बुलेट ' ला घेतले मालेगावातून ताब्यात

जळगावचा अट्टल गुन्हेगार ‘ बुलेट ‘ ला घेतले मालेगावातून ताब्यात

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव परिसरातील सम्राट कॉलनी येथे शेख जिशान शेख युनूस शिक्कलगर, वय १९ वर्षे याचा मासुमवाडी मध्ये डायमंड हॉलजवळ नऊ ते दहा व्यक्ती वाढदिवस साजरा करीत असतांना त्यांनी एकमेकांवर अंडे फेकले होते. सम्राट कॉलनी परिसरात घुसून एकमेकांशी हुज्जत घालत होते. ही माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी त्यांना जिल्हाधिकारी यांचेकडील आदेशान्वये जमाव बंदीचे आदेश आहे असे सांगितले. आणि त्यांना समजवण्याचा प्रयत्न करीत असतांना त्याच्या दिशेने जोरात दगडफेक करून तेथे असलेल्या मालवाहू रिक्षा व दोन मोटारसायकल यांचे नुकसान केले होते. म्हणून सरकारी कामात अडथळा आणला म्हणून पोलीस कॉन्स्टेबल छगन तायडे यांनी फिर्याद दिल्याने विविध कलमांव्यये गुन्हा नोंदविण्यात आला.सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पर्यन्त एकूण ६ आरोपींना अटक केली होती. आरोपी शेख नईम शेख कलीम ( वय २८ ) रा. मासुमवाडी जळगाव हा गुन्हा घडल्यापासून फरार असतांनाचे दरम्यान पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना माहिती मिळाली होती.त्यापैकी एक मुख्य होता. त्याचा शोध घेतला असता आरोपी हा मालेगाव येथे असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने ठिकाणी पथक रवाना करण्यात आले होते. त्यास मालेगाव येथील बॉम्बे हॉटेल येथून ताब्यात घेतले होते. त्यास अटक करण्यात आली आहे. तो गुन्हा घडल्यापासून फरार होता. त्याचेवर यापूर्वी १८ गुन्हे दाखल होते. सदरची कार्यवाही जयपाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, पोलीस उप निरीक्षक दीपक जगदाळे,अतुल वंजारी, किरण पाटील,किशोर पाटील, इम्रान सैय्यद, सुधीर साळवे, जमील शेख,छगन तायडे, किरण पाटील अशांनी केली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या