Monday, February 9, 2026
police dakshta logo
Homeजळगावजळगावचे नवे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद तर झेड.पी.सीईओ अंकित पन्नू यांची नियुक्ती

जळगावचे नवे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद तर झेड.पी.सीईओ अंकित पन्नू यांची नियुक्ती

जळगाव/कार्यकारी संपादक/तुषार वाघुळदे/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव येथील कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची तडकाफडकी बदली झाली असून शासनातर्फे तसे आदेश शुक्रवारी २१ जुलै रोजी संध्याकाळी उशिरा काढण्यात आले आहेत. त्यांची बदली कोणत्या कारणाने झाली हे मात्र समजू शकलेले नाही.त्यांच्या जागी जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून आयुष प्रसाद यांची नियुक्ती शासनाने केली आहे. ते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते.त्याच्या आधी ते अकोला जिल्हा परिषदेचे सीईओ होते.प्रशासकीय निर्णयाची गतीने अंमलबजावणी करणे, अशी त्यांची विशेष ओळख आहे.

तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांची देखील यवतमाळच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या जागी अंकित पन्नू यांची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान अमन मित्तल यांची बदली कोठे झाली झाली? याबाबत आदेशात नमूद नाही. तर आयुष प्रसाद यांना मित्तल यांच्या जागी तातडीने कार्यभार स्वीकारावा असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी याबाबतचे आदेश तातडीने जारी केले आहेत. दरम्यान गेल्या चार वर्षांपासून यशस्वीपणे कारकीर्द गाजवणारे डॉ. पंकज आशिया या बेधडक अधिकाऱ्यांची देखील यवतमाळच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी तरुण तडफदार अंकित पन्नू हे गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथून येत आहेत.ते दिल्ली येथील राहणारे आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या