Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeक्राईमजळगावच्या नंदनवन कॉलनीत महिलेच्या गळ्यातील पोत धूमस्टाईल लांबविली

जळगावच्या नंदनवन कॉलनीत महिलेच्या गळ्यातील पोत धूमस्टाईल लांबविली

जळगाव/विशेष प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगावात सध्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या लांबविल्याच्या घटनेत वाढ झालेली दिसून येत आहे. शहरातील खाजामिया समोरील नंदनवन कॉलनी परिसरात तारा हॉस्पिटल समोरून शतपावली करत असतांना एका महिलेच्या गळ्यातील ६५ हजार रुपये किमतीची सोन्याची मंगल पोत दुचाकीवरील अज्ञात दोन जणांनी धूमस्टाईल लांबवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, रिंगरोड परिसरातील फॉरेस्ट कॉलनी येथे ज्योती विजय शिरसाठ (वय ३८) या महिला आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. नेहमीप्रमाणे ज्योती शिरसाट या त्यांच्या शेजारी राहणाऱ्या भारती प्रवीण पाटील यांच्यासोबत शतपावली करण्यासाठी पायी निघाले. त्यावेळी नंदनवन कॉलनी येथील तारा हॉस्पिटल समोरून जात असताना मागून दोन अज्ञात चोरटे दुचाकीवर येऊन शिरसाठ यांच्या गळ्यातील ६५ हजार रुपये किमतीची सोन्याची
पोत जबरी हिसकावून लांबविण्याची घटना घडली. त्यांनी जोरजोराने आरडाओरड केली, परंतु तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. दरम्यान ही घटना घडल्यानंतर महिलेने दुपारी १२ वाजता जिल्हापेठ पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात दोन जणांविरोधात जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या