Friday, October 18, 2024
police dakshta logo
Homeक्राईमजळगावच्या पार्वतीनगरात घरफोडी ; ४ लाखांचा ऐवज पळविला

जळगावच्या पार्वतीनगरात घरफोडी ; ४ लाखांचा ऐवज पळविला

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:-जळगाव-शहरातील विविध भागात चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. शहर परिसरात विविध भागातील दोन घरांत घरफोडी करून भामट्यांनी चक्क साडेचार लाखांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी शहर पोलिसांत आणि रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

स्नेहल सौरभ फडके (38, रा.पार्वती नगर, जळगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. रविवार, 14 मे रोजी दुपारी दोन वाजता त्यांच्या खाजगी कामानिमित्त ते घराला कुलूप लावून बाहेरगावी गेल्या असता घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधली. घराचा मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातून सोन्या-चांदीचे दागिने, चांदीचे ताट, समई, निरंजनी, चांदीचे शिक्के, कॅमेरा आणि रोकड असा एकूण चार लाख रुपयांचा मुद्देमाल लांबवण्यात आला. स्नेहल फडके या बुधवारी दुपारी दोन वाजता घरी आल्यानंतर घरफोडीचा प्रकार लक्षात आला. त्यांनी तातडीने रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.दरम्यान रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त घालावी अशी अपेक्षा रहिवासी व्यक्त करीत आहेत.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास गभाले हे करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या