Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावजळगावच्या बिबानगर येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगावच्या बिबानगर येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव शहरातील बांबोरी रोडवरील बिबानगर परिसरात राहत्या घरात मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी गुरूवारी २० जुलै रोजी सकाळी ७ वाजता तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जितेश अनिल राठोड (वय २५) रा. बिबानगर, जळगाव असे मृत तरूणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेश राठोड हा पत्नीसह बिबा नगर परिसरात वास्तव्याला होता. रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करत होता. त्याचे आईवडील आणि मोठा भाऊ हे द्वारका नगरात वास्तव्याला आहेत. बुधवारी १९ जुलै रोजी रात्री पत्नीसोबत तो जेवण करून झोपला. मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास त्याने राहत्या घरात गळफास घेतला. दरम्यान रात्रीच्या जितेशच्या पत्नीला ही घटना समजल्यानंतर त्यांनी सासू आणि सासे यांना बोलावून घेतले. त्यानंतर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला.आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. तीन महिन्यापूर्वीच २२ मे रोजी त्याचे जितेशचे झाले होते. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या