Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeक्राईमजळगावच्या भास्कर मार्केटजवळ तरुणांमध्ये तुफान हाणामारी; ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगावच्या भास्कर मार्केटजवळ तरुणांमध्ये तुफान हाणामारी; ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे.तरुणांमध्ये वाढती गुन्हेगारी समाजासाठी डोकेदुखी ठरत आहे. शुक्रवारी ३० जून रोजी दुपारी चक्क जिल्हापेठ पोलीस ठाण्यापासून जवळ असलेल्या भास्कर मार्केटजवळ तरुणांच्या दोन गटात तुफान हाणामारी झाली. एकाकडून लोखंडी कोयता हस्तगत केला असून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भास्कर मार्केटच्या कमानीजवळ शुक्रवारी ३० जून रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास काहीजण कारण नसतांना एकमेकांमध्ये हाणामारी करत होते, ही माहिती जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यास समजली. त्यानुसार पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल केतन सुर्यवंशी, पोलीस हेड कॉन्स्टेबल सलीम तडवी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी हा प्रकार थांबविला. यातील एकाकडून कोयता हस्तगत केला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल केतन सुर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी शितल अभिमन्यू शिरसाळे, निर्भय शितल शिरसाळे दोन्ही रा. प्रबुध्द नगर, पिंप्राळा, जळगाव, हरीओम नगर, गौरव हृदयनाथ सोनवणे, तुषार हृदयनाथ सोनवणे दोन्ही रा. आसोदा रोड, जळगाव, दिनेश संतोष सोनवणे रा. निमखेडी रोड, जळगाव आणि तीन १७ वर्षीय अल्पवयीन मुले असे एकुण आठ जणांवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी तडवी हे करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या