जळगाव/प्रतिनिधी – शहरातील रामेश्वर कॉलनी येथे एका तरुणीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे.दरम्यान याबाबत औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही. शुभांगी बापू आवटे ( वय १८ ) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. आज पहाटे तिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.वैद्यकीय अधिकारी डॉ.निरंजन देशमुख यांनी मृत घोषित केले आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या पोलीस कर्मचारी सचिन मुंडे हे करीत आहेत.

