Friday, September 20, 2024
police dakshta logo
Homeजळगावजळगावच्या रेमंडचौकानजीक अपघात; मोटारसायकलस्वार ठार

जळगावच्या रेमंडचौकानजीक अपघात; मोटारसायकलस्वार ठार

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरूच आहे. एमआयडीसीतील लोकमत कार्यालयासमोर अज्ञात चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या अपघात प्रकरणी बुधवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर विजय घुगे (वय-३१) कालिंका माता मंदिर परिसर, जळगाव असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

एमआयडीसी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नाशिक येथील रहिवासी असलेला किशोर घुगे हा तरुण जळगाव शहरातील कालिंका माता मंदिर परिसरात आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. मंगळवारी ४ जुलै रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास किशोर घुगे हा त्याची दुचाकी (एमएच १५ एफके ८९५) वरून औरंगाबाद रस्त्यावरील एमआयडीसीतील लोकमत कार्यालयासमोरून जात होता. त्यावेळी दुचाकी मागून भरधाव वेगाने येणारे चारचाकी वाहन क्रमांक (एमएच ४८ एजी ८६४५) ने जोरदार धडक दिली. या धडकेत किशोर घुगे याचा मृत्यू ओढवला आहे. याप्रकरणी मयत किशोर घुगे याचे नातेवाईक अमोल शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बुधवार ५ जुलै रोजी रात्री ८ वाजता (एमएच ४८ एजी ८६४५) या वाहनावरील अज्ञात चालकाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक रूपाली महाजन करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या