Friday, September 20, 2024
police dakshta logo
Homeजळगावजळगावला मेडिकल हब होण्याबाबत बैठक

जळगावला मेडिकल हब होण्याबाबत बैठक

मुंबई / प्रतिनिधी / पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव येथील मेडिकल हबच्या कामाच्या संदर्भात सेवासदन या शासकीय निवासस्थानी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आढावा बैठक घेतली.

जळगाव येथे मेडिकल हबसाठी पाणी, वीज, रस्ता, जमीन अधिग्रहणासंदर्भात सर्व परवानग्या तत्काळ घेऊन पुढील कार्यवाही गतीने करण्याच्या सूचना यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव अश्विनी जोशी, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ.दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ.अजय चंदनवाले, वैद्यकीय शिक्षण विभागाचे उप सचिव प्रकाश सुरवसे, अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, अवर सचिव सुनील कुमार धोंडे, आयुषचे संचालक डॉ. रमण घुंगराळकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या