Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावजळगावहून पुणे, गोवा, हैदराबाद येथे विमानसेवा सुरु होणार; खा.उन्मेश दादांच्या प्रयत्नाला यश

जळगावहून पुणे, गोवा, हैदराबाद येथे विमानसेवा सुरु होणार; खा.उन्मेश दादांच्या प्रयत्नाला यश

जळगाव/विशेष प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:-जळगावची विमानसेवा अनेक कारणांमुळे रखडली होती.मध्ये सुरू झाली मात्र पुन्हा ‘जैसे थे ‘ परिस्थिती निर्माण झाली होती.विमानतळावर बंद पडलेली विमानसेवा नव्याने सुरू होणार आहे. यात पुणे, गोवा, आणि हैदराबाद येथे विमानसेवा सुरु होणार आहे. यामुळे जळगावकरांच्या संपर्काला प्रचंड गतीमान पंख लागणार आहे. विकासाबद्दल नेहमीच सकारात्मक भूमिका बजावणारे खासदार उन्मेषदादा पाटील यांचा जळगावचे कलावंत ,सामाजिक कार्यकर्ते तुषार वाघुळदे यांनी त्यांची भेट घेऊन अभिनंदन केले. पुणे येथील बहुप्रतिक्षित सेवा सुरु झाल्यामुळे हजारो प्रवाशांना सुविधा मिळणार आहे. खासदार उन्मेष पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे ही रखडलेली सेवा पुन्हा सुरु होणार आहे. जळगाव विमानतळावरील नियमीत प्रवासी वाहतूक सेवा ही बंद पडल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.आधी येथून दररोज मुंबई आणि अहमदाबाद येथे विमानसेवा सुरु झाली. मात्र काही महिन्यातच ही सेवा बंद झाली होती. सेवा पुन्हा कधी सुरु होणार ? याबाबत अनेकदा विचारणा करण्यात येत असते. यातच, पुण्यासारख्या ठिकाणी दररोज हजारो जळगावकर प्रवास करत असतात. त्यामुळे जळगाव ते पुणे आणि पुणे ते जळगांव अशी विमानसेवा सुरु करण्याची मागणी देखील कधीपासूनच करण्यात येत होती. आता या सर्व मागण्या पूर्ण होणार आहेत असे चिन्ह दिसत आहे. खासदार उन्मेष पाटील यांनी सातत्याने केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री ज्योतीरादित्य सिंदीया यांच्याकडे पाठपुरावा केला. तसेच, कंपन्यांशी देखील बोलणे सुरू केले. याचाच परिणाम असा की,आता जळगाव विमानतळाचा समावेश उडाण 5.0 अंतर्गत ‘ रीजनल कनेक्टीव्हिटी स्कीम ‘ मध्ये करण्यात आलेला आहे. यात जळगावसह सिंधुदुर्ग, नांदेड या विमानतळांवरून नियमीतपणे विमानसेवा सुरु करण्यात येणार आहे. यासाठी उडों एव्हीएशन प्रायव्हेटे लिमिटेड कंपनीच्या फ्लाय-91 या विमानसेवेला परवानगी प्रदान करण्यात आली आहे.जळगावकारांची इच्छा आता पूर्ण होणार असल्याबद्दल काहीसा दिलासा मिळाला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या