Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावजळगावातील तीन पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; नवीन अधिकारी येणार ....!

जळगावातील तीन पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; नवीन अधिकारी येणार ….!

जळगाव/,विशेष प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:-जळगाव-पोलीस दलात पुन्हा बदल करण्यात येत आहे.महाराष्ट्र राज्य पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले राज्यातील ४४९ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. यात जळगाव जिल्ह्यातील तीन पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. या बदल्यांचे आदेश शुक्रवारी रात्री काढण्यात आले आहेत. यात काही असे पोलीस अधिकारी आहेत, ज्यांनी बदल्यासाठी विनंती अर्ज केला होता. अनेक महिन्यांपासून हे अधिकारी बदल्यांच्या प्रतिक्षेत होते. अखेर त्यांची विनंती मान्य करत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस विभागाने जारी केलेल्या पत्रकानुसार, मुदत पूर्ण झालेल्या ३३६ आणि विनंतीनुसार ११३ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. अशा एकूण ४४९ पोलीस निरीक्षांच्या बदल्या पोलीस विभागाने केल्या आहेत

जिल्ह्यातील तीन पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
दरम्यान, राज्यात झालेल्या पोलीस निरीक्षकांच्या बदलामध्ये जळगाव जिल्ह्यातील तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यात सध्या जळगावमध्ये नेमणूक असलेले अनिल कटके यांची लाचलुचपत प्रतिबंध विभागात बदली झाली. तर प्रतापराव इंगळे (सध्या नेमणूक जळगाव)यांची जालना येथे बदली झाली. अशोक उतेकर (सध्या नेमणूक जळगाव) यांची ठाणे येथे बदली झाली. तर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक किसनराव गजन पाटील यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.

जिल्ह्यात येणारे नवीन अधिकारी
महेश शर्मा – सध्या नेमणूक नांदेड, जळगाव येणार आहेत.विशाल जैस्वाल-सध्या नेमणूक गडचिरोली, जळगाव
बबन जगताप-सध्या नेमणूक लातूर , जळगाव
सुनील पवार-सध्या नेमणूक धुळे, जळगाव असे अधिकारी असतील ,असे अधिकृतरित्या कळविण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या