Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावजळगावात आयोजित 'रान भाजी 'महोत्सवात नागरिकांनी दिला प्रतिसाद..

जळगावात आयोजित ‘रान भाजी ‘महोत्सवात नागरिकांनी दिला प्रतिसाद..

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव शहरात कृषि विभाग, प्रकल्प संचालक (आत्मा) जळगाव व रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच बायलॉजिस्ट आयडियल ऑर्गनायझेशन जळगाव यांच्या सहकार्याने एक दिवसीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन काल करण्यात आले होते. शहरातील रोटरी भवन मायादेवीनगर या ठिकाणी प्रकल्प संचालक आत्मा जळगाव तसेच रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १३ ऑगस्ट २०२३ रोजी रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.सदरील महोत्सवात जिल्ह्यातील पन्नास शेतकरी आणि शेतकरी गटांनी विविध प्रकारच्या रानभाज्या रानमेवा व रानभाज्यांची पाककला विक्री करता शहरातील नागरिकांना उपलब्ध करून दिली.यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आमदार राजू मामा भोळे, आमदार संजय सावकारे, महापौर जयश्री महाजन आदी मान्यवर बंधू भगिनी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या