Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeजळगावजळगावात चक्क तृतीयपंथीने केले तरुणाशी लग्न....

जळगावात चक्क तृतीयपंथीने केले तरुणाशी लग्न….

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- अनेक ठिकाणी अनेक प्रकारचे चकित घडणाऱ्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत.महिला असल्याचे भासवून एका तृतीयपंथीयाने जळगाव शहरातील एका तरुणाशी चक्क लग्न करीत त्याची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी न्यायालयाने तृतीयपंथीयाविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करून घेण्याचे आदेश दिले आहेत. जळगाव शहरतील एका २६ वर्षीय तरुणाची सोशल माध्यमाद्वारे एका तरुणीशी ओळख झाली. त्यानंतर संदेशाची देवाणघेवाण वाढून प्रत्यक्ष भेटी झाल्या. एकमेकांना ते भेटू लागले. दोघांचे ऐकमेकांवर प्रेम जडले. त्यानंतर दि. २९ एप्रिल २०२३ रोजी त्यांनी विवाह केला. काही दिवसांतच तरुणीच्या हालचाली वेगळ्या वाटल्याने आणि ती स्पर्श करू देत नसल्याने तरुणाला संशय निर्माण झाला. लग्नाच्या काही दिवसानंतर तरुणीला डॉक्टराकडे तपासणीस नेले असता ती तृतीयपंथी असल्याचे उघडकीस आले.या विषयाची परिसरात चर्चा रंगू लागली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या