Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeजळगावजळगावात राजमल लखीचंद ग्रूपवर ईडीची धाड

जळगावात राजमल लखीचंद ग्रूपवर ईडीची धाड

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव मधील प्रसिध्द सराफा पेढी म्हणून नाव असणाऱ्या आर. एल. ग्रुप अर्थात राजमल लखीचंद पेढीवर आज ईडीची धाड पडल्याने जळगावात सराफा बाजारात एकच खळबळ उडाली आहे. आर.एल. समूहाच्या अर्थात राजमल लखीचंद येथे जळगावच्या सराफ बाजारातील पेढीवर आज सकाळी सुमारे आठ वाजल्यापासून सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीच्या पथकाने छापा टाकला व आतापर्यंत तपासणी सुरू असून, या ग्रुपच्या पेढीसमोर पथकाची चारचाकी वाहने लागली आहेत. आत मध्ये अजूनही कारवाई सुरू असून अद्याप तरी कुणी याबाबत अधिकृतपणे माहिती दिलेली नाही. पोलीस दक्षता न्यूजच्या प्रतिनिधीने येथे भेट दिली असता पथक आतमध्ये तपासणी करत असल्याचे दिसून आले. ईडी पथकाच्या गाड्या अजूनही बाहेर उभ्या असून या फर्मचे सर्व दरवाजे बंद करून आतमध्ये तपासणी होत असल्याचे देखील निदर्शनास आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या