जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव जिल्ह्यातील 15 आदिवासी संघटनांनी एकत्र मणिपूर मधील स्रीयांवर झालेल्या हिंसे विरुध्द व राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी जन आक्रोश मोर्चा.मोर्चा वेळी काही मागण्याही करण्यात आल्यात. मध्यप्रदेश मधील आदिवासी युवकावर लघवी करून त्याला जे अपमानित केले त्या विरुध्द, तसेच जळगाव येथील एरंडोल येथील खडके गावातील वसतिगृहात लहान मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्या आरोपींना कठोर शासन करा आणि भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील 9 वर्षीय मुलीवर बलात्कार करत तीचा खून करण्यात आला आहे.त्या आरोपीला तात्काळ फासी देण्याची ही मागणी करण्यात आली. या जन आक्रोश मोर्चात विविध प्रकारच्या घोषणा देण्यात आला तेव्हा परिसर दणाणून गेला होता. आदिवासी संघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे , सपकाळे यांच्या अकरा संघटनाचे प्रतिनिधी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.