यावल/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- मित्रांसोबत सहलीला आलेल्या जळगावच्या २२ वर्षीय तरुणाचा मोर नदीपात्रात मोर नदीच्या डोहात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सायंकाळी घडली. दर्पण महेंद्र भोळे (रा. जुना खेडी रोड, जळगाव) असे या तरुणाचे नाव आहे.
दर्पण भोळे हा तरुण रविवार असल्याने गणेश मिस्त्री व विनीत पाटील या मित्रांसोबत मोर नदीपात्रातील कुराळ डोहानजीक वाजता सहलीला आला होता. त्याच्यासोबत न्हावी येथील काही तरुणही गेले होते. सायंकाळी पाच वाजता दर्पण हा डोहाकडे गेला आणि त्यात पोहण्यासाठी उतरला. मात्र, त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना कळविली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक नीलेश वाघ यांनी घटनास्थळ गाठले. अकस्मात मृत्यू म्हणून पोलिसात नोंद झाली आहे. मात्र, संततधार पाऊस व या घटनेमुळे अंधार पडल्याने दर्पण याचा शोध घ्यायला वेळ लागला, अखेर सकाळी मृतदेह बाहेर काढण्यात आला.या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.