Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावजळगाव येथील स्वातंत्र चौकातील अथर्व हॉस्पिटलमध्ये केरळच्या पारिचारिकेची आत्महत्या....!

जळगाव येथील स्वातंत्र चौकातील अथर्व हॉस्पिटलमध्ये केरळच्या पारिचारिकेची आत्महत्या….!

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगावात एका नर्सने हॉस्पिटलमध्ये आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे.रुग्णालयात काम करणाऱ्या २१ वर्षीय पारिचारिकेने कर्तव्यावर असतानाच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना जळगाव शहरातील स्वातंत्र्य चौकातील अथर्व हॉस्पिटल येथे रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. अकिना शाजी (वय-२१ वर्ष, रा. इकाड, राज्य केरळ ह. मु. अथर्व हॉस्पिटल, स्वातंत्र्य चौक, जळगाव) असे गळफास घेतलेल्या तरूणीचे नाव आहे. तिच्या आत्महत्या करण्यामागचे कारण मात्र समजू शकले नाही. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील अथर्व हॉस्पिटल येथे गेल्या काही महिन्यांपासून अकिना शाजी ही तिची मोठी बहीण अगीलू शाजी हिच्यासोबत राहत होती. दोन्ही बहिणी एकत्रच हॉस्पिटलमधील रूममध्ये वास्तव्याला होत्या. त्याच ठिकाणी एकत्र नोकरी करत होत्या. दरम्यान, शनिवारी अकिना हिची रात्र पाळी ड्यूटी होती. त्यावेळी तिची मोठी बहिण अगीलू हिची ड्यूटी संपल्याने ती रूमवर निघून गेली होती. मध्यरात्री अकिनाने हॉस्पिटलमध्येच कामावर असताना गळफास घेऊन आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास काही पारिचारिका नेहमीप्रमाणे रुग्णालयात कामावर आल्या असता, त्यांना रुग्णालयातील रूममध्ये अकिना फाशी घेतलेल्या अवस्थेत दिसून आली,त्यांना मोठा धक्का बसला. अकीना हिला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान आत्महत्या करण्यापूर्वी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास अकीना हिने फोनवरुन तिच्या कुटुंबियांशी संवाद साधला होता, सर्व काही व्यवस्थित आहे का? कसे आहात? अशी विचारणा सुद्धा केली, आणि त्यानंतर काही तासांनी तिने आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक मीरा देशमुख ह्या करीत आहेत.दरम्यान या घटनेची चर्चा हॉस्पिटल परिसरात सुरू होती.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या