Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावजळगाव सबजेल मध्ये एका कैदीवर अनैसर्गिक कृत्य करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

जळगाव सबजेल मध्ये एका कैदीवर अनैसर्गिक कृत्य करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:-जळगावची सबजेल या-ना त्या कारणाने अथवा वादग्रस्त विषयाने नेहमीच चर्चेत राहिली आहे,असाच एक लांच्छनास्पद प्रकार जेल मध्ये घडल्याने त्याची चर्चा सुरू झाली आहे.खूनाच्या गुन्ह्यात जिल्हा कारागृहात असलेल्या कैदिवर त्याच्या बॅरेकमधील इतर कैद्यांनी अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.या घटनेची वाच्यता केल्यास तरुणाला ठार मारण्याची धमकी दिली. तसेच अनैसर्गिक कृत्य करण्यास विरोध केला असता, त्या बंदीवर धारदार पट्टीने वार करुन गंभीर जखमी करण्यात आले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात चार बंदीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा कारागृहातील वर्ग २ मध्ये खूनाच्या गुन्ह्यात असलेला २६ वर्षीय संशयिताला ठेवण्यात आले आहे. त्याच्यासोबत बॅरेक १ व २ मध्ये भावेश कांतीलाल दंडगव्हाळ, विक्की शिंदे, कलीम शेख सलीम, विजय उर्फ राणा दिलीप चव्हाण या बंद्यांना ठेवले होते. दि. १२ रोजी त्या बंद्याला बाथरुममध्ये घेवून जात त्याच्यावर बळजबरीने अनैसर्गिक कृत्य केले. तसेच कोणाला काही सांगण्याचा प्रयत्न केला, तर तुला बघुन घेईल जीवे सोडणार नाही अशी धमकी दिली. त्याच दिवशी पहाटे चार वाजेच्या सुमारास तो बंदी झोपलेला असतांना त्याच बॅरेकमधील विक्की शिंदे याने त्याला उठवित अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला. परंतु घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या बंदीने त्यांना नकार दिला असता, त्यांनी त्याला ठार मारण्याची धमकी देत त्यांच्याकडील लोखंडी पट्टीने त्या बंदीच्या गळ्यावर वार केले. गळ्यावर वार झाल्याने जखमी झालेला बंदी जमिनीवर कोसळल्यानंतर बंद्यांनी दिलेल्या धमकीला घाबरुन तो गळ्याला कापड बांधून झोपून गेला. या घटनेबाबत कारागृहातील बंदीने त्या जखमी बंदीची विचारपूस केली. त्याने घडलेल्या प्रकाराबाबत त्याला सांगितला. हा प्रकार कारागृह प्रशासनाला माहिती पडताच त्यांनी बंदीला कारागृहातील इतर बॅरेकमध्ये हलविण्यात आले.दुसऱ्या बॅरेकमध्ये ठेवल्यानंतर देखील अत्याचार करणारे बंदी त्याच्याजवळ येवून त्याला अधूनमधून धमकी देतच होते. त्यामुळे वारंवार होणाऱ्या या त्रासाला कंटाळून त्या कैदीने घडलेली घटना दि.२० जुलै रोजी कारागृहातील अधिकाऱ्यांसमोर कथन केली. त्यांनी लागलीच कैदीला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात रवाना केले आणि उपचार करण्यात आले. त्याच्यावर दमदाटी करुन अनैसर्गिक कृत्य करणारा कारागृहातील बंदी भावेश कांतीलाल दंडगव्हाळ याच्यासह त्याचे मित्र लोखंडी पट्टीने वार करुन अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न करणारे त्याचे मित्र विकी शिंदे, कलीम शेख सलीम, विजय उर्फ राणा दिलीप चव्हाण यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उल्हास चऱ्हाटे हे करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या