Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeताज्या बातम्याजामगाव बुद्रुक येथे रमजान निमित्त हिंदू-मुस्लिम बांधवांची इफ्तार पार्टी संपन्न

जामगाव बुद्रुक येथे रमजान निमित्त हिंदू-मुस्लिम बांधवांची इफ्तार पार्टी संपन्न

मुख्य संपादक चंदन पाटील पोलीस दक्षता लाईव्ह…

सोलापूर/जिल्हा प्रतिनिधी खंडेराव पाटील/पोलीस दक्षता लाईव्ह:- सोलापूर तालुका मोहोळ जामेअ मस्जिद जामगाव बुद्रुक येथे मुस्लिम धर्मीयांचा पवित्र सण रमजान निमित्त शुक्रवार दिनांक ७ एप्रिल २०२३ रोजी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले हिंदू-मुस्लीम हम सब भाई भाई एकतेचे प्रतीक असलेलं गाव म्हणजे जामगाव बुद्रुक येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त आपल्या गावचे धडाडीचे कर्तबगार कार्यकर्ते आर पी आय गवई गटाचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय आयु. श्रीकांतजी गायकवाड साहेब व आर.पी.आय गवई गटाचे सर्व कार्यकर्ते तसेच लॉर्ड बुद्ध प्रतिष्ठान सोलापूर आयु. लखन वाघमारे व पोलीस दक्षता न्यूज चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी श्री खंडेराव पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आर.पी.आय पश्चिम महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष यांच्या वतीने शुभ हस्ते खजूर व कलिंगड खरबूज द्राक्षे फळांचे वाटप करून सर्व उपस्थित हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले व रोजा इफ्तार करण्यात आला तसेच सर्व मुस्लिम बांधवांना रमजान सणाच्या शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमाच्या वेळी आरपीआय जामगाव बुद्रुक शाखा अध्यक्ष आयु. सचिन गायकवाड आरपीआय सचिव आयु.ज्ञानेश्वर गायकवाड , दिगंबर गायकवाड, यशवंत गायकवाड, प्रदीप सोनवने आदी कार्यकर्ते या कार्यक्रमास उपस्थिती होती.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या