Wednesday, September 17, 2025
police dakshta logo
Homeजळगावजिजाऊनगरात बंद घर फोडले; सोन्याचांदीसह ऐवज लंपास, पोलीस खात्याबद्दल नाराजीचा सूर

जिजाऊनगरात बंद घर फोडले; सोन्याचांदीसह ऐवज लंपास, पोलीस खात्याबद्दल नाराजीचा सूर

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव तालुक्यातील सावखेडा शिवारातील जिजाऊनगर परिसरात बंद घराचे दरवाजाचे कडीकोंडा तोडून आत प्रवेश करून घरात कपाटात ठेवलेल्या सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोकड असे एकूण 38 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरल्याचा प्रकार तीस रोजी सकाळी सात वाजता उघडकीस आला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरात चोऱ्या वाढल्याने पोलीस विभागाबद्दल नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत अधिकृत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सावखेडा शिवारात राहणारे जिजाऊनगर मधील प्रकाश भगवान खैरनार व 48 हे व्यापारी आहेत. त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कडी कोयंडा तोडून घरातील दहा हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम सोन्याची पोत, 3500 रुपयांचे चांदीचे लक्ष्मी आणि गणपती देवाचे शिक्के, लक्ष्मीची मूर्ती आणि वीस हजार रुपयांची रोकड असा एकूण 38 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल लीलाधर महाजन करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या