Sunday, February 8, 2026
police dakshta logo
Homeजळगावजितेंद्र परदेशी यांना विद्यापीठाचा "उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी " पुरस्कार

जितेंद्र परदेशी यांना विद्यापीठाचा “उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी ” पुरस्कार

जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जितेंद्र रमेशसिंह परदेशी याची कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे वर्ष २०२२साठी “उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी-सेवा गौरव पुरस्कार”साठी निवड करण्यात आली आहे ,या बद्दल जितेंद्र परदेशी यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.त्यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा २०२२ वर्षीतचा “उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी-सेवा गौरव पुरस्कार” ११ ऑगस्ट रोजी जाहिररित्या देण्यात आला.

श्री.”परदेशी यांनी एम. ए.बी.एड. नंतर आता पी.एचडी. चा ध्यास घेऊन शैक्षणिक क्षेत्रात प्रगती दाखवली आहे. महाविद्यालयात असताना त्यांनी कामात प्राविण्य मिळवत, क्रीडा सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातही भरीव योगदान दिले आहे.राष्ट्रीय छात्र सेनेत असताना अनुशासनता त्यांनी अनुभवली आहे.मिळेल ते काम सचोटीने करायचे हा त्यांचा स्वभाव गुण आहे.अत्यंत खडतर परिस्थितीत सुद्धा लीलया पार करणारे लवकरच डॉ. जितेंद्र परदेशी बनून त्यांनी केंव्हातरी प्राचार्य ही बनावे अशी इच्छा अनेक मित्रांनी व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या