जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव – राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये निवृत्त झालेल्या शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. या निर्णयाविरोधात शिक्षण बचाव रोजगार बचाव आंदोलन करण्याचा ईशारा महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी दिला आहे.
निवृत्त शिक्षकांना कंत्राटी पध्दतीने सेवेत घेतल्यामुळे राज्यातील डीएड आणि बीएड झालेल्या तरुणांवर बेरोजगारिची वेळ येणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने निवृत्त शिक्षक भरतीचा निर्णय तातळीने रद्द करावा. या मागणीसाठी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चातर्फे सोमवारी दिनांक 17 जुलै 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.या आंदोलनात सुशिक्षित बेरोजगारांसह डीएड , बीएडच्या पदवीधरांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.