जळगाव/प्रतिनिधी/पोलीस दक्षता लाईव्ह:- आज 15 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेळी येथे विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.ध्वजारोहरानंतर पोलीस पाटील बेळी यांच्याकडून इयत्ता दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला. श्री.तेजस सोपान भंगाळे यांना रशियाचा जागतिक वर्ल्ड फोटोग्राफी 2023 स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेळी येथील विद्यार्थ्यांना स्वर्गीय गेंदालाल लीलाधर चौधरी यांच्या स्मरणार्थ. श्री भूषण गेंदलाल चौधरी यांचे चिरंजीव श्री.नेव्हिल भुषण चौधरी यांच्याकडून वह्या वाटप करण्यात आल्या. सदर प्रसंगी प्रशासक सौ.अहिरे मॅडम तलाठी सौ.मृणाली सोनवणे मॅडम ग्रामसेविका सौ.वैशाली पाटील मॅडम तसेच श्री.भूषण गेंदलाल चौधरी व व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी शाळेतील विविध योजनांची माहिती देण्यात आली विद्यार्थी पालकांची कार्यक्रमाला उपस्थिती होती. सूत्र संचालन मनोज नाले व लोटन पवार सर यांनी केले तर शाळेतील मुख्याध्यापक श्री.अनिल महाजन सर यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.