Thursday, September 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावजिल्हा शासकीय रुग्णालयात छाबडा एजन्सीजचे चौधरी परिवारातर्फे " माणुसकी धर्म " म्हणून...

जिल्हा शासकीय रुग्णालयात छाबडा एजन्सीजचे चौधरी परिवारातर्फे ” माणुसकी धर्म ” म्हणून रुग्णांना अन्न व मिठाई वाटप…

जळगाव/तुषार वाघुळदे/कार्यकारी संपादक/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव-गरजू ,गरीब रुग्णांच्या मदतीसाठी अनेक जण पुढे सरसावत असतात. शहरातील छाबडा एजन्सीजच्या परिवाराने सुद्धा औदार्य दाखविले असून त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल अनेकांनी कौतुक केले आहे.केवळ व्यावसायिक हित न जोपासता समाजाचे आपणही काही देणे लागतो,या उदात्त हेतूने सहकार्याची भावना त्यांनी दाखवली आहे.वाढदिवस ,लग्नाची वर्षपूर्ती आणि इतर सण, उत्सव,श्राद्ध यानिमित्त या उपक्रमामध्ये भाग घेता येतो. जळगावातील ” युवाचार्य फाऊंडेशन ” ही सामाजिक संस्था देखील पाच ते सहा वर्षांपासून कार्यरत आहे.त्यांना दानशूर व्यक्तींचे सहकार्य लाभत असते.परंतू असे काही महत्त्वाचे दिवस सोडल्यास काही इतर दिवशी कोणी दाता न मिळाल्यास,पुढे न आल्यास खान्देशातील प्रसिद्ध छाबडा एजन्सीजचे संचालक विनय चौधरी आणि विवेक चौधरी ( न्हावीकर ) त्या दिवसाची स्वतःहून जबाबदारी घेऊन गरज पूर्ण करत असतात .जेवणात भाजी ,पोळी,भात, वरण आणि प्रोटीनसाठी पौष्टिक लाडू किंवा मोहनथाळ असा मेनू असतो. रुग्णालयाच्या जनरल वॉर्ड मधील दररोज साधारण 70 ते 80 रुग्णांसाठी हे फूड पार्सल वाटले जातात. आज समाजात वावरताना बहुतांश सगळेच जण अर्थप्राप्ती साठी आणि भौतिक सुखाच्या मागे लागले आहेत. परमार्थही तितकाच महत्वाचा आहे.पण दातृत्वाची भावना अंगी बाळगणारे व्यक्ती हे खूप कमी आहेत.अनेकांकडे खूप काही असते,पण देण्याची ,गोरगरीब यांना सहकार्य करण्याची दानत नसते ,असे अनेक उदाहरणे आपण जीवन जगताना बघत असतो. ‘ माणुसकी धर्म ‘ पाळणेही तितकेच गरजेचे आहे.सामाजिक आत्मभान जपणारे सेवाभावी व्यक्तिमत्त्व छाबडा एजन्सीजचे संचालक श्री. विनय व विवेक चौधरी यांच्यातर्फे गरीब रुग्णांना जिल्हा शासकीय रुग्णालयात अन्नदान आणि मिठाईचे वाटप सायंकाळच्या सुमारास करण्यात आले ,अशा स्वरूपाचे कार्य करण्यासाठी इतरांनीही पुढे यावे असे आवाहन श्री.चौधरी परिवाराने केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या