Saturday, October 19, 2024
police dakshta logo
Homeजळगावजिल्ह्यातील चार पोलीस उप अधीक्षकांच्या बदल्या; नवीन अधिकाऱ्यांना आव्हान ठरणार...!

जिल्ह्यातील चार पोलीस उप अधीक्षकांच्या बदल्या; नवीन अधिकाऱ्यांना आव्हान ठरणार…!

जळगाव/कार्यकारी संपादक तुषार वाघुळदे/पोलीस दक्षता लाईव्ह:- जळगाव महाराष्ट्रातील पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. राज्यातील १४० हून अधिक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.नवीन रुजू होणाऱ्या पोलीस दलातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना गुन्हेगारीचे मूळ नष्ट करण्याचे आता एक आव्हानच ठरणार आहे.

नव्याने बदली झालेल्यांमध्ये

गडचांदूर, चंद्रपूरचे पोलीस उपअधीक्षक सुशीलकुमार काशीबाराव नायक यांची जळगाव शहर पोलीस उपअधीक्षकपदी बदली झाली आहे. तर भुसावळचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांची संगमनेर, जि.अहमदनगर पोलीस उपअधीक्षकपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी धर्माबाद, जि.नांदेड उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक विक्रांत हिंमत गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

जळगावातील बदली झालेले अधिकारी असे,
जळगाव मुख्यालयातील संदीप रघुनाथ गावीत यांची पाचोरा उपविभागाच्या पोलीस उपअधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. जळगाव आर्थिक गुन्हे शाखेचे भास्कर प्रभाकर डेरे यांची पिंपरी-चिंचवड सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली. गडचांदूर, चंद्रपूरचे पोलीस उपअधीक्षक सुशीलकुमार काशीबाराव नायक यांची जळगाव शहर पोलीस उपअधीक्षकपदी बदली झाली आहे. अमळनेर पोलीस उपअधीक्षक राकेश रावसाहेब जाधव यांची जालना पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोलीस उपअधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून गुन्ह्यांचे प्रमाण त्यात खून,घरफोड्या आणि जबरी चोऱ्या तसेच अवैध धंदे बोकाळले असून नवीन अधिकाऱ्यांना एक प्रकारचे आव्हानच असणार आहे. गुन्हेगारीचे समूळ नष्ट होण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या